Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हरीश साळवे (Harish Salve) त्यांची बाजू मांडणार आहेत. न्यायमूर्ती नविन चावला (Navin Chawla) यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात येईल.
अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यातर्फे हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. बिग बींच्या एकंदरीत व्यक्तीमत्त्वाचा विचार केल्यास त्यांनी कमावलेलं नाव, त्यांचा आवाज आणि समाजात असलेली त्यांची प्रतिमा या गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
Bollywood legend & Veteran Actor Amitabh Bachchan filed a suit in Delhi High Court seeking protection of his personality rights. Eminent lawyer Harish Salve appearing for him. The matter is underway before Justice Navin Chawla.
(File pic) pic.twitter.com/UlK3IPsh61
— ANI (@ANI) November 25, 2022
News Reels
अमिताभ बच्चन या नावाचं एक वलय आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या नावाचा गैरवापर होत आहे. याच भावनेने अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतला असावा. अमिताभ बच्चन त्यांच्या आवाजामुळे ओळखले जातात. अनेक जाहिराती, प्रमोशनमध्ये त्यांच्या आवाजाचा वापर केला जायचा. पण आता मात्र या गोष्टी करण्याला मर्यादा येतील. लवकरच दिल्ली उच्च न्यायालयाकडून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्या गोष्टीचा गैरवापर होऊ नये तसेच कायदेशीरदृष्ट्या आपल्या प्रत्येक गोष्टीला संरक्षण मिळवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजाचा चुकीचा वापर केला जात असल्याने नाराजी व्यक्त केली होती.
अमिताभ बच्चन फक्त अभिनयामुळेच नाही तर दमदार आवाजामुळे ओळखले जातात. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या चौदाव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. अभिनयासह त्यांनी अनेक सिनेमांत गाणीदेखील गायली आहेत. त्यांनी गायलेली अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या