Kiccha Sudeep South Superstar Kiccha Sudeep To Adopt 31 Cows Decision Taken For The Conservation Of Cows

0
31


Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या चर्चेत आहे. पण सध्या तो सिनेमामुळे चर्चेत नसून एका खास कारणामुळे चर्चेत आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे. 

किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी दत्तक घेणार आहे. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली. तसेच गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं त्याने कौतुक केलं. 

राज्य सरकारने पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अॅम्बिसीडरपदी किच्चा सुदीपची निवड केली आहे. त्यामुळे आता त्याच्या जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे. किच्चा म्हणाला,”मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त 11 गायी दत्तक घेतल्या आहेत. तसेच प्रभू चव्हाण यांनीदेखील 31 गायी दत्तक घेतल्याची घोषणा केली. त्यांना पाहून मीदेखील प्रत्येक जिल्ह्यातील एक गाय दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे”. 

News Reels

पुण्यकोटी दत्तू योजना राबवणारं कर्नाटक हे पहिलचं राज्य आहे. गो हत्या बंदी हा कायदा लागू झाल्यानंतर 100 गोशाळा स्थापन झाल्या असून त्याअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गाईच्या देखभालासाठी वर्षाला 11 हजार रुपये देण्यात येणार आहेत. 


लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पुण्यकोटी दत्तू पोर्टलमधील गोशाळांना किमान 10 रुपये दान करता येणार आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीने गोशाळा सुरळीतपणे चालवण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्यादेखील गोशाळा सुदृढ करता येणार आहेत.  

संबंधित बातम्या

Vikrant Rona : किच्चा सुदीपच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘विक्रांत रोना’ ओटीटीवर रिलीज





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here