Malayalam Writer Satheesh Babu Payyanur Dies At The Age Of 59 Found Dead In His Flat

0
28


Satheesh Babu Payyanur: मल्याळम (Malayalam) लेखक सतीश बाबू पायनूर (Satheesh Babu Payyanur) यांचे गुरुवारी (24 नोव्हेंबर) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांचा मृतदेह हा त्यांच्या वांचियूर तिरुवनंतपुरम (Vanchiyoor, Thiruvananthapuram) येथील राहत्या घरी आढळला. सतीश यांची पत्नी गुरुवारी घराबाहेर गेली होती. त्यामुळे सतीश हे घरात एकटेच होते. सतीश यांनी कोणाचाही फोन उचलला नाही तसेच दार वाजवल्यानंतर घरातून आवाज आला नसल्यानं, सतीश यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी घरात सतीश यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत अढळला. सतीश (Satheesh Babu Payyanur Death) यांच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. 

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सतीश बाबू पायनूर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. शुक्रवारी (25 नोव्हेंबर) शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पलक्कड येथील पाथिरीपालामध्ये सतीश बाबू पायनूर यांचा जन्म झाला. त्यांनी उच्च शिक्षण हे कान्हागड आणि पयन्नूर येथून पूर्ण केले. सतीश बाबू  पायनूर हे प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते. मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलं. 

मन्नू, दैवापुरा, मांजा सूर्यंते नलुकल आणि कुडामणिकल किलुंगिया रविल यासह अनेक कादंबर्‍यांचे ते लेखक आहेत. त्यांनी मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना 2012 मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. केरळ साहित्य अकादमी आणि केरळ राज्य चालचित्र अकादमीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

केरळच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सतीश बाबू यांनी अनेक डॉक्युमेंट्री बनवल्या आहेत तसेच त्यांनी 1992 च्या नक्षत्रकूदरम चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Priyanshu Kshatriya:’झुंड’ मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here