Vikram Gokhale Health Update Big Update On Vikram Gokhale Health Health Deteriorated Again

0
28


Vikram Gokhale health updte : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली होती. पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे. 

मेडिकल बुलेटिन नुसार, विक्रम गोखले अजूनही व्हेंटीलेटरवर असून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. तसेच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषधे चालू केली आहेत. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. एकीकडे त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असताना दुसरीकडे त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीने या बातम्या फेटाळून लावल्या. 

News Reels

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

रंगभूमी, सिनेमा, मालिका, वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली आहे. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत. आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘गोदावरी’ सिनेमात विक्रम गोखले महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

विक्रम गोखले यांनी 30 ऑक्टोबरला त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला होता. विक्रम गोखले यांच्या अभिनयाला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या ‘सिंहासन’ या वेबसीरिजमध्ये ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. 

संबंधित बातम्या

Vikram Gokhale health updte: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा, व्हेंटिलेटरही हटवण्याची शक्यता





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here