Bhediya Box Office Collection Day 2 Varun-dhawan Kriti Sanon Movie

0
32


Bhediya Box Office Collection Day 2: दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) , अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) यांच्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

भेडियानं ओपनिंग डेला 7.48 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (26 नोव्हेंबर) या चित्रपटानं 9.57 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 17.05 कोटींची कमाई केली आहे. 60 ते 70 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. 

भेडिया या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका आहे. वरुणनं या चित्रपटात भास्कर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. क्रितीनं या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. वरुण आणि क्रिती यांच्या बरोबरच अभिनेता अभिषेक बॅनर्जी, दीपक डोबरियाल आणि पॉलिन कबाक यांनी देखील भेडिया चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. दिनेश विज्ञान यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


 

वरुण आणि क्रितीचे आगामी चित्रपट

वरुण आणि क्रितीच्या भेडियामधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. वरुणचा बवाल हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर क्रितीच्या आदिरुपुरुष या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदिपुरुष या चित्रपटात क्रितीसोबत प्रभास देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bhediya Review: हॉरर अन् कॉमेडीचा तडका; कसा आहे वरुण आणि क्रितीचा भेडिया? वाचा रिव्ह्यू





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here