Kantara Actor Rishab Shetty Say Not Interested To Work With Rashmika Mandanna

0
44


Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. कांतारामुळे ऋषभला विशेष लोकप्रियता मिळाली. ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ कोणत्या अभिनेत्रीसोबत आगामी चित्रपटात काम करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये ऋषभला काही अभिनेत्रींबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ऋषभनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

सामंथा रुथ प्रभु, रश्मिका मंदाना, कीर्ती सुरेश आणि साई पल्लवी या अभिनेत्रींसोबत काम करायला तुला आवडेल का? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये ऋषभला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ऋषभ म्हणाला, ‘मी स्क्रिप्टवर पूर्ण काम केल्यानंतर चित्रपटातील कलाकारांची निवड करतो.  मला असे कलाकार आवडत नाहीत.’

कोणत्याही अभिनेत्रीचं नाव न घेता पुढे ऋषभ म्हणाला, ‘मला ती आवडत नाही. मला साई पल्लवी आणि समंथासोबत काम करायला आवडेल.’ ऋषभ शेट्टीच्या या उत्तरानं सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की, ऋषभनं रश्मिकासोबत काम करण्यास नकार दिला.

ऋषभनं पुढे मुलाखतीमध्ये कांताराच्या शूटिंगमधील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, ‘कांताराचा क्लायमॅक्स सीन खूप कठीण होता. शूटिंगदरम्यान माझे दोन्ही खांदे डिस्लोकेट झाले. तरीही मी शूटिंग करत होतो.’

News Reels

‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. ‘कांतारा’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 

कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन करणाऱ्या ऋषभनं या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील  ऋषभच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटासाठी  ऋषभनं चार कोटी मानधन घेतलं. 

एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं कांताराला मिळालेल्या यशाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला की, ‘हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही.  मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.’

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kantara: कांतारा फेम ऋषभ शेट्टी ‘या’ चित्रपटात करणार नाही काम? अभिनेत्याला केलं जाऊ शकतं रिप्लेस



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here