Kantara Starrer Rishab Shetty Likely Replaced From Rakshit Shetty Bachelor Party Movie

0
29


Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पण एका आगामी चित्रपटातून ऋषभनं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रक्षित शेट्टीच्या बॅचलर पार्टी या चित्रपटात आता ऋषभ शेट्टी काम करणार नाही. रक्षित शेट्टीचा ‘बॅचलर पार्टी’ या चित्रपटाची घोषणा सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. या कॉमेडी चित्रपटात ऋषभ शेट्टी, दिगंत मंचाळे आणि अच्युत कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार असल्याचे निश्चित झाले. पण बॅचलर पार्टीमधील अभिनेता दिगंत मंचाळे याने चित्रपटात ऋषभ शेट्टीच्या भूमिकेबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. यूट्यूबर मधु सुदानला दिलेल्या मुलाखतीत दिगंतने सांगितले आहे की, ‘रक्षित शेट्टीच्या बॅचलर पार्टीच्या चित्रपटातून ऋषभ शेट्टीला रिप्लेस केले जाऊ शकते.’

पुढे दिगंत मंचाळेनं सांगितलं, सध्या ऋषभ शेट्टी यांच्या कांतारा चित्रपटाला यश मिळत आहे. अशातच ते कांतारा पार्ट 2 ची तयारी करत आहेत, त्यामुळे बॅचलर पार्टीसाठी त्यांच्याकडे वेळ नहीये. ऋषभ यांना बॅचर पार्टी चित्रपटातून रिप्लेस केले जाऊ शकते.

 कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. ‘कांतारा’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. 

News Reels

एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं कांताराला मिळालेल्या यशाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला की, ‘हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही.  मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.’

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kantara 2: ‘कांतारा-2’ प्रदर्शित होणार? ऋषभ शेट्टी म्हणाला…



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here