Kim Kardashian Take Action On Showing Her Private Photos To Employee By His Ex Husband Kanye West

0
29


Kim Kardashian: हॉलिवूड (Hollywood) स्टार आणि अभिनेत्री किम कर्दाशियनचा (Kim Kardashian) पूर्वाश्रमीचा पती रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, यीजी अडिडास कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कान्येवर असा आरोप केला आहे की, तो किम कार्दशियनचे अश्लील फोटो  यीजी अडिडास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दाखवत होता.

अश्लील फोटो दाखवण्यासोबतच कान्येवर 2018 मध्ये झालेल्या मीटिंगदरम्यान किमचे अश्लील व्हिडिओ दाखवल्याचाही आरोप आहे. या सर्व माहितीनंतर कान्ये हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यूएस वीकलीच्या एका रिपोर्टमध्ये, किमनं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर आरोप केल्यानंतर काय पाऊल उचललं, याबाबत सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोपांची किम चौकशी करत आहे
किम कार्दशियन यीजी अडिडास कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्याची चौकशी करत आहे. किन या कान्यावर करण्यात आलेल्या या आरोपांमुळे सध्या खूप निराश आहे, तिल भीती वाटत आहे. ती या आरोपांची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्यात सध्या सध्या व्यस्थ आहे. कर्मचाऱ्यांनी तिचे कोणते फोटो पाहिले आहेत, याची माहिती किम घेत आहे. 

किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.  लग्नाच्या सात वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये किमने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. 

News Reels

किम ही हॉलिवूड स्टार आहे. तिला इन्स्टाग्रामवर 334 मिलियन फॉलोवर्स आहेत. किम तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 27 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here