Milk Price What Are The Rates In China Pakistan Bangladesh Nepal

  0
  25


  Milk Price : दूध (Milk) हा सर्वांनाच आवश्यक असणारा घटक आहे. आपल्या दैनंदीन जीवनात सगळीकडे दुधाचा समावेश केला जातो. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश केला जातो. आपल्या देशात एक लिटर दुधासाठी जवळपास 50 रुपये मोजावे लागतात. हे आपणा सर्वांना माहितच असेल. पण आपल्या शेजारच्या किंवा अन्य देशात दुधाला किती रुपयांचा दर (Milk Price) मिळतो हे तुम्हाला माहिता आहे का?  पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि चीनमध्ये सध्या दुधाला किती दर आहे. याची माहिती आपण जाणून घेऊयात…

  पाकिस्तान (Pakistan)

  आपल्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानमध्ये दुधाची किंमत भारतापेक्षा तिप्पट आहे. एक लिटर दुधासाठी पाकिस्तानमध्ये तब्बल 170 रुपये मोजावे लागतात. 26 ऑक्टोबर 2022 रोजी कराचीच्या आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली होती. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये दुधाचा सरकारी दर 120 रुपये प्रति लिटर ठरवण्यात आला होता. त्यानंतर या आदेशाला दूध विक्रेत्यांनी विरोध केला होता. 200 रुपये लिटरने दूध विकण्याची मागणी करण्यात आली होती. यावरुन सरकारी यंत्रणा आणि स्थानिक विक्रेते यांच्यात जोरदार वादावादी झाली.

  बांगलादेश (Bangladesh)

  पाकिस्तानात सुरु असलेल्या खराब आर्थिक स्थितीचा आणि मंदीचा परिणाम दुधाच्या किंमतीवर दिसत आहे. तर दुसरीकडे, बांगलादेश या बाबतीत आर्थिकदृष्ट्या संपन्न वाटतो. पाकिस्तानात जिथे दुधाचा दर प्रति लिटर 150 रुपयांच्या वर आहे तिथं बांगलादेशात दुधाची किंमत प्रति लिटर 0.73 डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार बांगलादेशात एक लिटर दुधासाठी 60 रुपये मोजावे लागतात. 

  नेपाळ (Nepal)

  नेपाळचे चलन डॉलरच्या तुलनेत काहीसे कमकुवत आहे. त्याचा परिणाम दुधाच्या दरावर दिसून येत आहे. नेपाळच्या डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने निर्देश जारी करून काही महिन्यांपूर्वीच दुधाचा दर प्रतिलिटर 85 रुपये निश्चित केला होता. सध्या नेपाळमध्ये प्रति लिटर दुधासाठी 85  ते 90 रुपये मोजावे लागत आहेत.

  News Reels

  चीन (China)

  चीनची चलन स्थिती इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. चिनी दुधाची किंमत प्रतिलिटर 1.39 डॉलर आहे. भारतीय चलनानुसार, एका भारतीय व्यक्तीला चीनमध्ये दूध खरेदी करण्यासाठी सुमारे 114 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच चीनमध्ये दूध पिणे भारतीयांसाठी खूप महाग आहे.

  महत्त्वाच्या बातम्या:

  Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here