Manoj Bajpayee Mother Death : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या आईचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्या आईवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोज वाजपेयी यांच्या आईवर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशलिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईचे निधन झाले तेव्हा मनोज वाजपेयी रुग्णालयातच होते.
आईच्या निधनाने मनोज वाजपेयी यांना मोठा धक्का बसला आहे. अशोक पंडित यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,”आईच्या निधनाने मनोज वाजपेयी यांच्यासह कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother .
News Reels
ओम शांति !
🙏
— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022
एक वर्षापूर्वी वडिलांचे निधन
मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे म्हणजेच राधाकांत वाजपेयी यांचे निधन मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाले होते. मनोज वाजपेयी यांचं त्यांच्या आई-वडिलांसोबतचं नातं खूप घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने लगेचच आईचे निधन झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोज वाजपेयी यांचे आई-वडील नेहमी त्यांचं कौतुक करत असे. त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटायचा.
मीडिया रिपोर्टनुसार, मनोज वाजपेयी यांच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होत होती. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरदेखील मेहनत घेत होते. पण आज सकाळी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांच्या आईचे निधन झाले.
गेल्या 20 दिवसांपासून मनोज वाजपेयी यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आईने दिलेली शिकवण आयुष्यात खूप उपयोगी पडत असल्याचं मनोज वाजपेयी यांनी अनेकदा सांगितलं आहे. मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ‘डिस्पॅच’, ‘गुलमोहर’, आणि ‘जोरम’ सारख्या अनेक सिनेमांत मनोज वाजपेयी झळकणार आहेत.
संंबंधित बातम्या