Amrish Puri Biopic On Iconic In The Works Grandson Vardhan Puri To Make

0
21


Amrish Puri Biopic : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड आहे. अशातच आता ‘मोगॅम्बो’  उर्फ दिवंगत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा बायोपिक येणार असल्याचं समोर आलं आहे. रुपेरी पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात कसा होता हे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 

सर्वांच्या आवडीचा खलनायक!

खलनायक सहसा आवडीचा होत नाही. पण अमरीश पुरी मात्र याला अपवाद आहेत. खलनायक म्हणून अमरीश पुरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता अमरीश पुरी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुपिते जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


News Reels

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अमरीश पुरी यांचा नातू म्हणजेच वर्धन पुरी याला त्याच्या आजोबांच्या आयुष्यावर सिनेमा बनवायचा आहे. त्यामुळे या बायोपिकच्या कामाला लवकरच सुरुवात होऊ शकते. अमरीश पुरी यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 

अमरीश पुरी यांनी 1967 ते 2005 पर्यंत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. भारदस्त आवाजामुळे त्यांनी या सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमरीश पुरी यांनी 450 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. 

अमरीश पुरी यांना ‘कोयला’, ‘बादशाह, ‘करण अर्जुन’ आणि ‘गदर: एक प्रेमकथा’ यांसारख्या सिनेमांतील खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 12 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले. 

संबंधित बातम्या

Ashok Kumar Death Anniversary : कुमुदलाल गांगुली ते चित्रपटसृष्टीचे ‘दादामुनी’; अशोककुमार यांच्याबद्दल या गोष्टी माहित आहे का?

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here