Ashok Kumar Death Anniversary The Versatile Actor Who Took A Vow Of Entertainment Know About Dadamuni Aka Ashok Kumar In Cinema

0
33


Ashok Kumar : ‘दादामुनी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांची गणना बॉलिवूडच्या (Bollywood) अतुलनीय नायकांमध्ये केली जाते. अनेक दशकं त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे. 

अशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. कुमुदलाल गांगुली असं त्यांचं नाव होतं. त्यांचे वडील वकील असल्याने आपल्या मुलाने वकीलच व्हावं अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर अशोक कुमार यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण शिक्षणाची गोडी नसल्याने ते अभ्यासात नापास झाले. त्यानंतर वडिलांकडून ओरडा पडू नये त्यामुळे ते घरातून पळून गेले आणि मुंबई गाठली. 

अशोक कुमार मुंबईत त्यांच्या बहिणीच्या घरी राहायला गेले. त्यावेळी बहिणीचा नवरा म्हणजेच शशधर मुखर्जी हे सिने-निर्माते होते. बॉम्बे टॉकीजमध्ये ते काम करत असे. मुंबईत आल्यानंतर अशोक कुमार यांना पैसे कमवण्याची गरज होती. त्यामुळे शशधर मुखर्जी यांनी त्यांना बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरी मिळवून दिली. अशाप्रकारे अशोक कुमार यांचं सिनेमांसोबत नातं निर्माण झालं. 

अशोक कुमार यांचे गाजलेले सिनेमे (Ashok Kumar Movies) – 

‘जीवन नया’ (Jeevan Naya) या सिनेमाच्या माध्यमातून अशोक कुमार यांनी 1936 साली खऱ्या अर्थाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. ‘अच्छूत कन्या’ (Achhut Kannya), ‘बंधन’ (Bandhan),’किस्मत’ (Kismat),’महल’ (Mahal),’हावडा ब्रिज’ (Howrah Bridge),’खूबसूरत’ (Khoobsurat) असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 

News Reels

अशोक कुमार यांनी देविका राणी ते मीना कुमारीपर्यंत त्याकाळातील अनेक नायिकांसोबत काम केलं आहे. त्याकाळी ते सुपरस्टार होते. तेव्हा सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. बॉलिवूडचा पहिला ‘अॅंटी हीरो’ (Anti Hero) म्हणूनही ते ओळखले जात.

अशोक कुमार यांनी सिनेमांसह मालिकेतदेखील काम केलं आहे. तसेच त्यांनी अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे. 1943 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘किस्मत’ (Kismat) या सिनेमात ते पहिल्यांदा अॅंटी हीरो’च्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमता ते एका पॉकेटमारच्या भूमिकेत होते. ग्यान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

अशोक कुमार यांनी 2001 साली वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनयासोबत ते एक उत्तम गायक आणि चित्रकारदेखील होते. त्यांनी होमिओपॅथीची पदवी घेतली होती. अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलं आहे. 

संंबंधित बातम्या

BLOG : बॉलिवूडचा पहिला अँटी हिरो अशोक कुमारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here