Salaam Venky Box Office Collection Kajol Salaam Venky Hit The Box Office On Its First Day Of Release Know Opening Day Collection

0
35


Salaam Venky Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. नुकताच तिचा ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात काजोलसह विशाल जेठवा (Vishal Jethwa) मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत होता. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 

‘सलाम वेंकी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता होती. आई आणि मुलाची हृदयाला भिडणारी सिनेमाची कथा बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली जादू दाखवण्यात कमी पडली आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवशीची कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. 


News Reels

पहिल्या दिवसाची कमाई (Salaam Venky Box Office Collection Day 1) : 

‘सलाम वेंकी’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त साठ लाखांचा गल्ला जमवला आहे. निर्मात्यांची या सिनेमाकडून खूप अपेक्षा होती. पण ओपनिंग डेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकाव धरण्यात कमी पडला. आता वीकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा आहे. अभिनेत्री रेवतीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एक आई आपल्याच मुलाच्या मरणाची मागणी करते, अशी हृदयाला भिडणारी या सिनेमाची कथा आहे. 

30 कोटींच्या बजेटमध्ये ‘सलाम वेंकी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात विशालने वेंकीची भूमिका साकारली आहे. तर काजोलने त्याच्या आईची म्हणजेच सुजाताची भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या

Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here