Sara Ali Khan Travels Back Home Via Mumbai Local Train Shares Quirky Video

0
25


Sara Ali Khan Local Train Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस जगात वावरताना ती नेहमीच जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते. नुकतच तिने लोकन ट्रेन आणि रिक्षाने प्रवास केला आहे. प्रवासादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

‘केदारनाथ’च्या माध्यमातून (Kedarnath) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने 9 डिसेंबर 2022 रोजी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा लोकल ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,”नमस्कार… आज आम्ही आमच्या डोक्याचा वापर केला. वेळेचा सदुपयोग करत आम्ही लोकलने प्रवास केला आहे.”


News Reels

साराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने मेकअपदेखील केलेला नाही. त्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना आवडला आहे. एवढी श्रीमंत असूनही लोकलने प्रवास, अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

साराचे आगामी सिनेमे

साराने 2018 साली ‘केदारनाथ’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर तिने ‘सिम्बा’ ‘कुली नंबर 1’, ‘लव आज कल’, ‘अतरंगी रे’ अशा अनेक सिनेमांत काम केलं. लवकरच ती ‘मेट्रो इन दिनो’, ‘नखरेवाली’, ‘लुका छुप्पी’, ‘गॅसलाइट’ आणि ‘द इमोर्टल अश्वाथामा’ या सिनेमांत झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Sara Ali Khan ने शेअर केले Sushant Singh Rajput चे फोटो, ‘हे’ आहे कारण

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here