Dilip Kumar 100th Birth Anniversary Dilip Saheb The King Of Acting First Film Was A Flop But Later He Dominated Bollywood

0
34


Dilip Kumar 100th Birth Anniversary : बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची आज 100 वी जयंती आहे. भारतीय सिनेसृष्टीत दिलीप कुमार ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जायचे. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

मुहम्मद युसुफ खान ते दिलीप कुमार…

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1900 रोजी पाकिस्तानात झाला. त्यांचे नाव मुहम्मद युसुफ खान असे होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पुण्यात नोकरी करायला सुरुवात केली. त्यावेळी देविका राणी यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि दिलीप कुमार यांचं आयुष्यचं बदललं. देविका राणी यांच्या माध्यमातून दिलीप कुमार यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. तसेच देविका राणी यांनीच त्यांचं नाव ‘युसूफ खान’ ऐवजी दिलीप कुमार ठेवलं. 

पहिलाच सिनेमा फ्लॉप!

दिलीप कुमार यांनी 1944 साली ‘ज्वार भाटा’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 1947 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जुगनू’ (Jugnu) या सिनेमात दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. हा त्यांचा पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमाने त्यांना बॉलिवूडमधील हिट फिल्मस्टार्समध्ये (Film Stars) स्थान मिळवून दिले. 

पाच दशकात 57 सिनेमे

दीदार (Didar) आणि देवदाससारख्या (Devdas) सिनेमातील गंभीर भूमिकांमुळे दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग (Tragedy King) म्हणून ओळखले जाऊ लागले. दिलीप कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शक्ति’ सिनेमात काम केलं होतं. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. पाच दशकात त्यांनी 57 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे.

News Reels

दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 व्या वर्षात लग्न केलं. अभिनेत्री सायरा बानोसोबत ते लग्नबंधनात अडकले. त्यावेळी सायरा फक्त 22 वर्षांची होती. त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी आस्मासोबत दुसरं लग्नदेखील केलं होतं. 

दिलीप कुमार आणि मधुबाला (Dilip Kumar And Madhubala) : 

1944 साली ‘जवार भाटा’ या सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबालाची भेट झाली. त्यानंतर ‘मुगल-ए-आजम’ या सिनेमाच्या सेटवर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मधुबालाला दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण मधुबालाच्या कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. त्यामुळे दिलीप कुमार यांनी त्यांना लग्नासाठी नकार दिला. 

दिलीप कुमार यांचे टॉप 10 सिनेमे (Dilip Kumar Top 10 Movies) :

  • मुगल-ए-आजम
  • अंदाज
  • नया दौर
  • देवदास
  • राम और श्याम
  • मधुमती
  • गोपी
  • आजाद
  • शक्ति
  • सगीना

संबंधित बातम्या

Dilip Kumar Funeral : दिग्गज अभिनेत्याला अखेरचा निरोप; तिरंग्यात लपेटलेल्या दिलीपकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here