Drishyam 2 Collection Ajay Devgn Movie Drishyam 2 Has Crossed The 200 Crore Mark At The Box Office

0
18


Drishyam 2 Collection : वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमाचा समावेश आहे. हा रहस्यमय सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

‘दृश्यम 2’ने केली 200 कोटींची कमाई

‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीजच्या 23 दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 18 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. रिपोर्टनुसार, या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 4.65 कोटींची कमाई करत 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेला अजयचा तिसरा सिनेमा

अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाने 205 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 2020 साली ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाने 279 कोटींची कमाई केली. त्यानंतर आता ‘दृश्यम 2’ हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. लवकरच हा सिनेमा 250 कोटींचा टप्पा पार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


2022 मध्ये ‘हे’ सिनेमे 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ सह ‘ब्रह्मास्त्र’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘भूल भुलैया 2’ हे सिनेमेदेखील यावर्षात 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. आता ‘दृश्यम 2’ आणखी किती कमाई करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने 203.57 कोटींची कमाई केली आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘दृश्यम 2’ या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या सिनेमात अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. आता रिलीजच्या सहा महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या

Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील; दुसऱ्या आठवड्यातही तुफान कमाई

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here