Sai Pallavi Will Debut In Bollywood Through The Ramayana Blockbuster Movie

0
21


Sai Pallavi Bollywood Debut : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) दबदबा आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमे आणि वेबसीरिज हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहेत. कोरोनानंतर सिनेरसिक जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहू लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत असताना आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. 

दाक्षिणात्य सिने-निर्माता अल्लू अरविंदचा ‘रामायण’ (Ramayana) हा सिनेमा पुन्हा एकचा सध्या चर्चेत आला आहे. 2019 साली या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याची चर्चा सुरू झाली होती. अशातच दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्ल्वी या सिनेमाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


News Reels

‘रामायण’ हा पौराणिक सिनेमा असून या सिनेमात साई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या पॅन इंडिया सिनेमाच्या स्टारकास्ट संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमावर काम सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता ‘रामायण’ची उत्सुकता वाढली आहे. 

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ या सिनेमाची संहिता गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीच लिहून झाली आहे. हा एक मल्टी स्टारर बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमासाठी निर्मात्यांनी ऋतिक रोशन, राम चरण आणि प्रभासला संपर्क केल्याचं म्हटलं जात होतं. पण आता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण या सिनेमात मुख्य भूमिकेत असतील असं म्हटलं जात आहे. 

‘रामायण’ 2023 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

‘रामायण’ हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या सिनेमाचा साई पल्लवी भाग असल्याने तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. 

संबंधित बातम्या

Sai Pallavi: ‘या’ कारणामुळे बालपणी खाल्ला होता मार; साई पल्लवीनं सांगितला मजेशीर किस्सा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here