Year Ender 2022 Brahmastra To Drishyam 2 100 Crores Club In 2022 With These Movie

0
19


Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले…

ब्रह्मास्त्र (Brahmastra) : 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा ब्लॉकबस्टर सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 257 कोटींची कमाई केली. तर जागतिक पातळीवर सिनेमाने 418 कोटींची कमाई केली आहे. 

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) : 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाला विरोध करण्यात आला होता. बायकॉट ट्रेंडचादेखील सिनेमाला सामना करावा लागला. पण तरीही या सिनेमाने 132 कोटींची कमाई केली. 

भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) : 

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 2022 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या सिनेमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 184 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

News Reels

द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) : 

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. एकीकडे या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. दुसरीकडे या सिनेमाचे, कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 252.25 कोटींची कमाई केली. 

दृश्यम 2 (Drishyam 2) :

अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुचर्चित ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

संबंधित बातम्या

Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत ‘या’ कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here