China Threating Bhutan For Having Good Relations With India May Increase Territorial Disputes

  0
  21


  China-Bhutan Relation :ड्रॅगन’ची आता नवीन चाल पाहायला मिळत आहे. भारतासोबतची भूतानची (India-Bhutan Relation) जवळीक ‘ड्रॅगन’ला खटकताना दिसत आहे. त्यामुळे चीनने (China) आता भूतानला (Bhutan) धमकी दिली आहे. चीनवर नेहमीच इतर देशांना धमकावल्याने आरोप लावले जातात. रिपोर्टनुसार, आता चीनने भूतानला भारतासोबतच्या करारावरून धमकी दिल्याचं म्हटलं जात आहे. नेपाळच्या एपर्डाफास.कॉमने (Apperdafas.com) तज्ज्ञांच्या अहवालानुसार माहिती दिली आहे की, चीन आता भूतानला भारतासोबत प्रादेशिक वाद वाढवण्यासाठी धमकावू शकतो. यामागचं कारण म्हणजे चीनच्या मते, भूतानच्या चीनसाठी असणाऱ्या परराष्ट्र धोरणावर भारताचं नियंत्रण आहे. त्यामुळे चीन भारत-भूतान संबंधांविरोधात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

  भूतान आणि चीनचं संबंध बिघडले

  भूतान आणि चीन यांच्यामध्ये आधी चांगले संबंध होते, मात्र 1949 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केल्याने भूतानसोबतचे चीनचे संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर चीनी नेता माओ त्झ-तोंग यांनी भूतानच्या क्षेत्रावर दावा केल्याने हे संबंध आणखीनच बिघडले. चीनने 1954 आणि 1958 सालच्या नवे नकाशे आणि भूतानमधील 300 वर्ग मीटर क्षेत्र अवैधरित्या ताब्यात घेतल्याने भूतान आणि चीन संबंधांमध्ये फूट पडली.

  भारताची भूतानला मदत

  भूतान आणि चीनमध्ये वाद सुरु असताना भारताने 1961 मध्ये भूतानच्या सुरक्षा दलांना प्रशिक्षित करण्यासाठी भूतानमध्ये लष्करी प्रशिक्षण दल (IMTRAT) तैनात करून मदत केली. तेव्हापासून भारताकडून भूतानला सुरक्षा पुरवली जात आहे. 2017 मध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान डोकलाममध्ये झालेल्या संघर्षामुळे सुरक्षेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा झाला होता. अशा परिस्थितीत, सीमा सुरक्षित करण्यासाठी भारत आणि भूतानच्या सैन्यामध्ये अधिक चांगला समन्वय आणि भागीदारीची गरज होती.

  भारताशी भूतानची चीनला खटकतेय जवळीक

  भारताने भूतानला शैक्षणिक क्षेत्रात 4,500 कोटी रुपयांचे अनुदान दिलं आहे. तसेच भारत आणि भूतानमध्ये 2018 ते 2023 या कालावधीसाठी 400 कोटी रुपयांची संक्रमणकालीन व्यापार सुविधा करार देखील झाला आहे. यामुळे भारत-भूतान यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान इतर अनेक क्षेत्रात एकत्र काम सुरु आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात भूतानचे राजे भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा केली. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांमुळे चीनला त्रास होत असल्याने चीन आता भूतानला लक्ष्य करू शकतो, असं रिपोर्टनुसार समोर येत आहे.

  News Reels

  दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत

  भूतान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध फायदेशीर आहेत. जलविद्युत, व्यापार, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक विकास यासह विविध क्षेत्रात भारताने भूतानला महत्त्वाची मदत दिली आहे. भूतानच्या निर्यातीसाठीही भारत ही मोठी बाजारपेठ आहे. भारत-भूतान संबंध जलविद्युत निर्मितीशी संबंधित आहेत. भारत आणि भूतान यांच्यामध्ये भूतानमध्ये 10,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी करार झाला आहे.   Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here