Onkar Bhojane The Marathi Film Sarla Ek Koti Will Soon Hit The Screens

0
21


Onkar Bhojane On Sarla Ek Koti : आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने (Onkar Bhojane) आता एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ (Sarla Ek Koti) या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

20 जानेवारीला ‘सरला एक कोटी’ होणार प्रदर्शित

‘सरला एक कोटी’ या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ओंकारचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा सिनेमा नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘सरला एक कोटी’ हा सिनेमा येत्या 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे. 


News Reels

‘सरला एक कोटी’ या नावातच या सिनेमाचं वेगळेपण आहे. ओंकारच्या या पोस्टरमध्ये तो पैसे लाऊन पत्ते खेळताना दिसतोय, समोर सिगरेटची थोटकं आणी दारूची बाटली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला ओंकार एक बिधनास्त लूक देताना दिसतो आहे.

पोस्टरवर ‘जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर’ असे लिहिण्यात आले आहे. पत्ते, दारूचा गुत्ता, सिगरेट, बिनधास्त हावभाव अशा सगळ्या गोष्टी आणि चित्रपटाचं नाव ‘सरला एक कोटी’ असल्याने सिनेमाचा विषय नक्की काय, त्याची कथा काय आणि हे सगळं कधी उलगडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यातही ओंकारचं हे पोस्टर बघून अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की सिनेमाच्या नावात असलेली ‘सरला’ कुठंय?

संबंधित बातम्या

Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ; कसं ठरतं TRP चं गणित? जाणून घ्या…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here