Pathaan First Song Besharam Rang Released Shah Rukh Khan Deepika Padukone Besharam Rang Song Video

0
25


Pathaan Song Besharam Rang : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) असे या गाण्याचे नाव आहे. 

‘बेशरम रंग’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खानची हॉट आणि सिजलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दीपिकाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. शाहरुख आणि दीपिकाचा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

‘बेशरम रंग’ हे गाणं शिल्पा राव, caralisa monteiro, विशाल आणि शेखरने गायलं आहे. तर कुमार के ने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विशाल आणि शेखरने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘बेशरम रंग’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणं अल्पावधीतच हिट होणार आहे. 


25 जानेवारीला ‘पठाण’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘पठाण’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी कमबॅक करणार आहे. 

‘पठाण’ या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्याचा व्हिडीओ शाहरुखने शेअर करत लिहिलं आहे,”तिला पाहून तुम्हालाही कळेल…सौंदर्य ही एक वृत्ती आहे”. शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडीओवर आता सिनेमाची प्रतीक्षा, आग लावली, दीपिकापेक्षा तू हॉट दिसतो आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; मंदिराच्या आवारातील व्हिडीओ व्हायरल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here