Mission Majnu Release Date Announce : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
‘मिशन मजनू’ हा थराथ नाट्य असणारा सिनेमा 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थसह या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची सिद्धार्थच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
News Reels
सिद्धार्थने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत सिद्धार्थने लिहिलं आहे,”एका रॉ एजंटची कहानी… ‘मिशन मजनू’ हा सिनेमा 20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
‘मिशन मजनू’च्या पोस्टरमधील सिद्धार्थच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. डोळ्यात काजळ, गळ्यात ताबीज आणि बेधडक नजर असा सिद्धार्थचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात सिद्धार्थ रॉ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका एका पाकिस्तानात राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या