Urfi Javed Urfi Javed Troubles Increase Again Accused Of Spreading Obscenity In Society

0
20


Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने ती चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) अश्लीलता पसरवबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.   

उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्फी नेहमीच फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवते, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

वकील काशिफ खान (Kashif Khan) यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात लिखित स्वरुपाचा अर्ज देत उर्फी विरोधात तक्रार दाखल केली आहे. उर्फी नेहमीच बोल्ड लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला नेटकरी ट्रोल करत असतात. पण तरीही चाहत्यांसाठी उर्फी फोटो पोस्ट करते. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान भाऊनेही (Hindustani Bhau) उर्फीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली होती. 

News Reels


मुंबई पोलिसांआधी दिल्ली पोलीस ठाण्यातदेखील एका व्यक्तीने उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती. समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. ‘हाय हाय ये मजबूरी’ या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बोल्ड कपडे घातल्यानेदेखील तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूकमधले फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ट्रोल असताना लाईमलाईटमध्ये येण्याची ती एकही संधी सोडत नाही. उर्फीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. एका एपिसोडसाठी ती चांगलंच मानधन घेते. 

संबंधित बातम्या

Urfi Javed Video : हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; व्हिडीओ व्हायरल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here