Urmila Kothare Break Up Post Goes Viral Amid Divorce Talks

0
18


Urmila Kothare : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


उर्मिलाचा ‘ऑटोग्राफ’ (Autograph) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ‘अधुरे अधुरे’ (Adhure Adhure) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणं उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पण या गाण्यापेक्षा उर्मिलाने दिलेल्या कॅप्शनची चर्चा जास्त होत आहे. 

News Reels

उर्मिलाने लिहिलं आहे,”ब्रेकअप झालंय? अबोला धरलाय? आठवण येतेय खूप? त्रास होतोय ना… कानात हेडफोन्स घाला आणि गाणं ऐका”. एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सतीश राजवडेंनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

उर्मिलाचा ‘ऑटोग्राफ’ 30 डिसेंबरला होणार प्रदर्शित

उर्मिला कोठारेचा ‘ऑटोग्राफ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात उर्मिलासह अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, मानसी मोघे हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

उर्मिला-आदिनाथच्या घटस्फोटाच्या चर्चा का रंगल्या? 

‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या प्रमोशनला उर्मिला कोठारेने कुठेच हजेरी लावली नव्हती. सोशल मीडियावरुनदेखील उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं होतं. तसेच एकाच सोसायटीत राहून दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते. उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. अशा अनेक कारणांमुळे उर्मिला आणि आदिनाथच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या.

संबंधित बातम्या

Autograph : एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी ‘ऑटोग्राफ’, अभिनेता अंकुश चौधरी झळकणार मुख्य भूमिकेत!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here