New Zealand Banned Cigarettespassed World First Law To Ban Smoking For Next Generation Marathi News

  0
  22


  New zealand Banned Cigarettes : धूम्रपान (Smoking) आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून आता न्यूझीलंडने (New zealand) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरूणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे. याबाबत सरकारने मंगळवारी संसदेत एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार न्यूझीलंडच्या (2009 नंतर जन्मलेल्या) येणाऱ्या पिढ्यांना तंबाखू खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारच्या मते, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा हा जगातील पहिला कायदा असेल.

  नवीन कायद्यांमध्ये 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणीही उल्लंघन करताना आढळल्यास NZ$150,000 ($95,910) पर्यंत दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, धूम्रपान बंदी व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी लागू राहील असेही कायद्यात नमूद करण्यात आले आहे. 

  निकोटीनचे प्रमाणही कमी होणार

  न्यूझीलंडमध्ये संमत झालेल्या या कायद्यानुसार धूम्रपानासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीनचे प्रमाणही कमी केले जाणार आहे. एका निवेदनात, सहयोगी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेरल यांनी सांगितले की, हा कायदा धूरमुक्त भविष्याकडे प्रगतीला गती देईल. 

  News Reels

  त्या पुढे म्हणाल्या की, “हा कायदा संमत झाल्यानंतर हजारो लोक अधिक काळ जगतील, निरोगी आयुष्य जगतील आणि आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल. याचं कारण असं की, धूम्रपानामुळे होणारे आजार जसे की, कर्करोग (Cancer), हृदयविकाराचा झटका (Heart Attack, पक्षाघात (Paralysis) यांसारख्या आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. 2023 च्या अखेरीस तंबाखू विक्रीसाठी परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या 6,000 वरून 600 पर्यंत कमी केली जाईल.” असे सांगण्यात आले आहे. 

  धूम्रपान विरोधी कडक कायदे करणार

  सहयोगी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेरल यांनी म्हटल्याप्रमाणे, न्यूझीलंड 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी धूम्रपान विरोधी कायदे आणखी कडक करणार आहे. भूतानमध्ये 2010 मध्येच सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्ये धूम्रपानविरोधी कडक कायदे असतील.

  न्यूझीलंडमधील प्रौढ धूम्रपान करणाऱ्यांची संख्या गेल्या दशकात निम्म्या पटींनी कमी होऊन ही संख्या आठ टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी 56,000 लोकांनी धूम्रपान सोडले आहे. 

  महत्वाच्या बातम्या : 

  Artificial Uterus Facility द्वारे बाळाच्या डोळ्यांचा आणि केसांचा रंगही ठरवता येणार; EctoLife कंपनीचा दावा  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here