Actor Veena Kapoor Files FIR Over Rumours That Her Son Killed Her Im Alive

0
18


Veena Kapoor: मुंबईमधील (Mumbai) एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी  जुहूमधील वीणा कपूर (Veena Kapoor) नावाच्या महिलेची हत्या झाली होती. त्या महिलेच्या मुलानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह हा नदीमध्ये फेकला. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. या महिलेचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक ठिकाणी  व्हायरल झालेल्या माहितीमध्ये अभिनेत्री वीणा कपूर यांचा फोटो आणि माहिती वापरण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री वीणा कपूर (Actress Veena Kapoor) यांना अनेकांनी फोन करुन या प्रकरणाबाबत विचारलं. पण आता ANI या वृत्तसंस्थेला अभिनेत्री वीणा कपूर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या बातमीबद्दल माहिती दिली असून त्यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली आहे. 

काय म्हणाल्या वीणा कपूर? 
अभिनेत्री वीणा कपूर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं,  ‘वीणा कपूर नावाच्या महिलेचा खून झाला आहे. पण मी ती वीणा कपूर नाही. फक्त नाव सारखं आहे.  मी गोरेगावमध्ये राहते. मी देखील माझ्या मुलासोबत राहते. त्यामुळे लोकांनी हा विचार केला की, ज्या महिलेचा खून झाला आहे,  ती वीणा कपूर मी आहे. मी जिवंत आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आज जर मी पोलिसांकडे तक्रार केली नसती तर पुढे  देखील अनेक लोकांना असे अनुभव आले असते. ‘ 

‘आम्ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. ‘ असं वीणा कपूर यांच्या मुलानं सांगितलं. 

पसरलेल्या अफवांमुळे मानसिक त्रास झाला आणि त्यामुळे मला कामात लक्ष देता येत नव्हते, असे देखील अभिनेत्री वीणा कपूर यांनी सांगितले. 

 “आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे,”  अशी माहिती दिंडोशी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 15 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here