Urfi Javed Becomes The Most Searched Asian Celebrity In The World Beats Sara Ali Khan Janhvi Kapoor Disha Patani

0
20


Urfi Javed: अतरंगी स्टाईल आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा (Urfi Javed)  चाहता वर्ग मोठा आहे. उर्फी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फी ही कधी  प्लास्टिकचा, कधी वायर तर कधी सेप्टीपीन्सपासून तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट करते. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. उर्फी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतीच ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ (Most Searched Asian on Google 2022)  ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उर्फीनं जान्हवी कपूर, सारा अली खान या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. 

‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ ती यादी 

‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ च्या यादीत उर्फी ही 43 व्या क्रमांकावर आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही या यादीमध्ये 50 व्या क्रमांकावर आहे. जाह्नवी कपूर ही 65 आणि सारा अली खान ही 88 व्या क्रमांकावर आहे. बॉलिवूडमधील ग्लॅमरस दिशा पाटनी 90 व्या क्रमांकावर आहे. 


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. 2

015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Urfi Javed : कधी प्लास्टिकचा, तर कधी सेप्टीपीन्सचा ड्रेस घालणाऱ्या उर्फीचं लग्न झालंय? जाणून घ्या, उर्फी जावेदच्या सिक्रेट थिंग्स

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here