Cinema Vehicle For People Of Different Colours, Castes And Religions To Better Understand Each Other Shah Rukh Khan At Kolkata Film Festival

0
17


Shah Rukh Khan In Kolkata International Film Festival : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) किंग खानने एक विधान केलं आहे. तो म्हणाला,”विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी सिनेमा हे योग्य माध्यम आहे”. 

आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात शाहरुख  म्हणाला,”एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सिनेमा मदत करतो. सोशल मीडियावर सिनेमाचं प्रमोशन करताना त्या सिनेमाला नकारात्मकतेचा सामना करावा लागतो असं म्हटलं जातं. पण मी त्या विरोधात आहे. मला असं वाटतं, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाचं योग्यप्रकारे प्रमोशन करता येतं”. 

News Reels

शाहरुख पुढे म्हणाला,”आता जागतिक पातळीवरच्या सिनेमाची निर्मिती करणं गरजेचं आहे. विविध संस्कृती आणि जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम सिनेमा करतो. त्यामुळे सिनेमाची सकारात्मक बाजू समजून घ्यायला हवी. सध्या सिनेमांमध्ये नव-नवीन प्रयोग केले जात आहेत. नव्या पिढीपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी सिनेमाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. 

नकारात्मकतेबद्दल शाहरुख म्हणाला,”सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मंडळी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सिनेमा समाज बदलवण्याचं काम करत असतो. त्यामुळे जग काहीही करो.. मी आणि तुमच्यासारखी सकारात्मक विचार करणारी काही मंडळी अजून जिवंत आहेत”.   

किंग खानचं चार वर्षांनी कमबॅक!

शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 

‘पठाण’ या सिनेमातील बेशरम रंग (Beshram Rang) या गाण्यात दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही मंडळींनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : “काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवतायत” ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here