Ed Summons To Actor Rakul Preet Singh In Money Laundering Case 

0
20


Rakul Preet Singh : मनोरंजन विश्वातून दररोज काही ना काही नवीन बातम्या येत असतात. मग ते तारकांच्या चित्रपटाशी संबंधित अपडेट असोत किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कोणतीही माहिती असो. आजही चित्रपट जगतातून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातीलच महत्वाची बातमी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने तिला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी ईडीने सप्टेंबर महिन्यात रकुलला चौकशीसाठी बोलावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे.

विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी रकुलची सुमारे अडीच तास चौकशी केली होती. हे प्रकरण 40 वर्षे जुने ड्रग्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी इतर अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होती आणि 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी 11 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

ईडीने या प्रकरणाची चौकशी केली केल्यानंतर त्यांना मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्यांनी या संदर्भात तपास सुरू केला असून रकुल प्रीत तसेच चार्मे कौर, पुरी जगन्नाथ, तेजा, मुमैथ खान आणि राणा दग्गुबती यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलण्यात आले आहे. 

सुशांत सिंगच्या मृत्यू वेळीही रकुलचीही चौकशी झाली होती

News Reels

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना आणि ड्रग्ज प्रकरणाबाबत या प्रकरणात चौकशी सुरू असताना देखील रकुलची चौकशी झाली होती. त्यावेळी ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली त्यात रकुल प्रीतचे नावही पुढे आले होते. मात्र, या चौकशीत रकुल प्रीत आरोपी असल्याचे सिद्ध झाले नाही.

 वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर रकुल प्रीतचा पुढचा चित्रपट ‘छत्रीवाली’ येणार आहे. या चित्रपटात रकुल एका कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे काम त्याची गुणवत्ता तपासणे आहे. याशिवाय ती अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here