Rajkumar Santoshi On Gandhi Godse Ek Yudh : लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्वावर ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी सांभाळणार आहेत. तर ए आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्वावर म्हणजेच 26 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमात गांधी आणि गोडसे यांची भूमिका नक्की कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण पवन चोप्रा आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमाचा भाग असू शकतात असे म्हटले जात आहे. चिन्यमयने या सिनेमाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पडद्यावर!
गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं होतं. तसेच महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या माध्यमातून दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर पाहायला मिळणार आहे.
राजकुमार संतोषी यांनी 80 चं दशक चांगलच गाजवलं. ‘दामिनी, घातक, घायल, खाकी, अजब प्रेम की गजब कहामी, अंदाज अपना अपना असे अनेक गाजलेले सिनेमे राजकुमार संतोषी यांनी दिले आहेत. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या निमित्ताने ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या