Amit Antil Case Filed Against Popular Small Screen Actor For Sexual Harassment Police Are Investigating

0
25


Amit Antil : मॉडेल व छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित अंतिल (Amit Antil) विरोधात लैंगिक शोषण (Sexual Harassment) आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

दक्षिण मुंबईतील एका 42 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने महिलेसोबत आधी मैत्री केली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. या भेटीदरम्यान त्याने गुपचूप तिचे इंटिमेट फोटो काढले. पुढे त्या फोटोंचा वापर करुन त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 

फोटोंचा गैरवापर करण्यासोबत त्याने तिच्याकडून 6.5 लाख रुपये उकळले. तसेच आणखी 18 लाखांची त्याने मागणी केली होती. अमितने त्या महिलेला मुलाचा जीव घेणार असं ब्लॅकमेल केल्याने पीडित महिला घाबरली. पण त्याने 18 लाखांची मागणी केल्यानंतर तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

मलबार हिल येथील पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ), 384, 417, 504, आणि 506 या कलमांनुसार अमित विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमितने पीडित महिलेकडून आधी 95 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर 5.5 लाख रुपये घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

News Reels

अमित अंतिल कोण आहे? (Who Is Amit Antil?)

अमित अंतिल हा हरियाणातील एक कलाकार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांत तो झळकला आहे. काही मालिकांसह सिनेमांतदेखील त्याने काम केलं आहे. लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महिलेने अभिनेत्यावर केलेले आरोप कितपत खरे आहेत हे लवकरच समोर येईल. Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here