Kuttey Trailer 1 Haddi Aur 7 Kuttey Arjun Kapoor Kuttey Teaser Out

0
22


Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘कुत्ते’ (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 

‘कुत्ते’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.  हटके नावामुळे या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता अर्जुनने या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सिनेमा सात लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. सात जण एका गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत. आता ती गोष्ट नक्की काय असेल हे प्रेक्षकांना सिनेमात कळेल. 


News Reels

‘एक हड्डी और सात तुकडे’ अशी ‘कुत्ते’ या सिनेमाची टॅगलाईन आहे. एका करप्ट पोलीस अधिकाऱ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. ‘कुत्ते’चा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून अर्जुनच्या चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. ट्रेलर शेअर करत अर्जुनने लिहिलं आहे,”हटो कमीनो, कुत्ते आ गए”. 

‘कुत्ते’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Kuttey Release Date) : 

‘कुत्ते’ हा सिनेमा 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, ‘कुत्ते’हा सिनेमा गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच या सिनेमाला विशाल भारद्वाजने संगीत दिलं असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.

संबंधित बातम्या

Kuttey first look : दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त स्टारकास्टसह ‘Kuttey’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here