Taliban: तालिबानने अफगाणिस्तानमध्ये (Taliban Afganistan) महिलांविरोधात कठोर आदेश जारी केले आहेत. अफगाणमधील महिलांसाठीचं विद्यापीठ बंद करण्याची घोषणा तालिबानी सरकारकडून करण्यात आली आहे. तालिबानच्या नव्या आदेशानंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध केला जात आहे.
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या एका पत्रानुसार, तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानध्ये मुली आणि महिलांना विद्यापीठात प्रवेश देण्यात येणार नाही. उच्च शिक्षणमंत्री मोहम्मद नदीम यांचे हस्ताक्षर देखील या पत्रावर आहे. या पत्रात पुढील आदेशापर्यंत महिलांचे शिक्षण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान तीन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील हजारो मुली आणि महिलांनी विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. या नव्या आदेशामुळे अफगाणिस्तानातील हजारो मुलींचे भविष्य घोक्यात आले आहे. या अगोगर देखील तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला त्यावेळी महिलांच्या शिक्षणाबद्दल आदेश जारी केला होता. या आदेशात पुरूषांच्या महाविद्यालयात महिलांना शिक्षण घेता येणार नाही. तसेच मुलींना (Women Education) शिकवणारे सर्व शिक्षक या महिलाच पाहिजे.
अफगाणिस्तानमध्ये महिलांना जीममध्ये जाण्यास बंदी
तसेच तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना जीममध्ये (Gym) जाण्यास बंदी केली. एक वर्षापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता हाती घेतल्यापासून महिलांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. तालिबानच्या या आदेशाचा अनेक महिलांनी विरोध केला आहे. तसेच आंदोलन देखील केली. तालिबानच्या या आदेशाचा जगभरातून निषेध केला जात आहे.
News Reels
तालिबान ताब्यात आल्यानंतर देशाची स्थिती
15 ऑगस्ट 2021 चा तो काळा दिवस, जेव्हा पुन्हा एकदा तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर आले. या दिवसापासून लोकांचे आणि विशेषतः महिलांचे जीवन उद्धवस्थ होऊ लागले. अफगाणिस्तान आधीच अनेक संकटांचा सामना करत होता आणि अशा परिस्थितीत तालिबान राजवटीने या देशाची स्थिती आणखी बिकट करण्याचे काम केले. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) नुसार, अफगाणिस्तानची निम्मी लोकसंख्या अन्नावाचून मरत आहे. 95 टक्के लोकसंख्येकडे खायला पुरेसे अन्न नाही. या देशात पाच वर्षांखालील दहा लाखांहून अधिक मुले गंभीर कुपोषणाची शिकार झाली आहेत.
संबंधित बातम्या :
Afghanistan : तालिबान सरकारचा महिलांवर जाच, शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना चाबकाचे फटके