Samantha Ruth Prabhu Health Will Samantha Take A Break From Cinema The Big Reason Came Up

0
28


Samantha Ruth Prabhu Health : सौंदर्यवती समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता तिच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला ‘मायोसिटिस’ नावाज आजार झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामुळे सध्या तिचे चाहते चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिने एक मोठा बॉलिवूडचा प्रोजेक्ट सोडल्याची माहिती समोर आली होती. पण आता ही अफवा असल्याचे म्हटले जात आहे. 

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, समंथाची प्रकृती खालावली असली तरी अजूनही ती सिटाडेलचा भाग आहे. तिने जानेवारी महिन्यातील तिच्या तारखाही दिल्या आहेत. तसेच तिची उपलब्धता लक्षात घेत तिच्या शूटिंगसाठीच्या तारखा निश्चित केल्या जातील. लवकरच ती शूटिंगला सुरुवात करणार आहे. 


दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मायोसिटिस नावाच्या आजारासंदर्भात माहिती दिली होती. तिने लिहिलं होतं,”काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. यातून बरं होण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. 

समंथाना ‘शाकुंतलम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गुनशेखरने केलं आहे समंथासह या सिनेमात अल्लू अरहा, मोहन बाबूदेखील झळकणार आहेत.

संबंधित बातम्या 

Samantha : अभिनेत्री समंथाला जडला मायोसिटिस हा दुर्मिळ आजार, फोटो शेअर करत दिली माहिती 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here