Shah Rukh Khan Becomes The Only Indian Actor To Rank Among 50 Greatest Actors Of All Time

0
31


Shah Rukh Khan Features In Empire Magazine : ‘पठाण’च्या वादात (Pathaan Controversy) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) आणखी एक खिताब आपल्या नावे केला आहे. ‘एंपायर मॅगजीन’ने (Empire Magazine) 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता शाहरुख खानचं नाव आहे. 

50 महान अभिनेत्यांच्या यादीत ‘किंग खान’चा समावेश 

‘एंपायर मॅगजीन’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त भारतातील शाहरुख खान या एकाच अभिनेत्याचा समावेश आहे. त्यामुळे बादशाहचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते किंग खानला शुभेच्छा देत आहेत. 

‘एंपायर मॅगजीन’ने जाहीर केलेल्या यादीत भारतातील शाहरुख खानसह टॉम क्रुझ, अल पचीनो, टॉम हॅंक्स, जॅक निकोलसन, लियोनार्डो दीकॅप्रिओ, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्डमन अशा अनेक दिग्दजांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासिकात शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता है’ (राहुल), ‘देवदास’ (देवदास मुखर्जी) ते ‘स्वदेस’ (मोहन भागर्व) अशा अनेक सिनेमांतील त्याच्या कामाची प्रशंसा करण्यात आली आहे. 

News Reels


चार वर्षांनी शाहरुखचं कमबॅक!

शाहरुख चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतीच त्याची एक झलक आलिया-रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात दिसली होती. सध्या तो त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर दुसरीकडे या सिनेमाची शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’सह शाहरुख ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमातदेखील झळकणार आहे. 

शाहरुख खानने 1992 साली ‘दीवाना’ (Deewana) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘डर’, ‘बाजीगर’ आणि ‘अंजाम’ या सिनेमांत तो खलनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला पण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) या सिनेमांत त्याचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळाला. किंग खानने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गेली तीन दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख म्हणतो, ‘माझ्या घरात 12 ते 13 टिव्ही’; व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here