Tejaswini Pandit In An Interview Tejaswini Pandi Has Commented On Many Things Related To Her Life

0
22


Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज एक उत्तम अभिनेत्री आणि निर्माती आहे. सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Saumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टवरील मुलाखतीत तेजस्विनीने तिच्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. तेजस्विनी म्हणाली, “वेळेनुसार स्वत:ला अपडेट करण्यासाठी विविध गोष्टी बघण्याची गरज आहे”. 

मराठी मनोरंजनसृष्टीतील निर्माते कलाकारांना वेळच्या वेळी मानधन देत नाहीत अशी ओरड असताना तेजस्विनी मात्र एक उत्तम निर्माती आहे. यावर बोलताना ती म्हणाली,”माझ्यात प्रचंड माज आहे असं दिसत असलं तरी मी काम केलेला एकही जण मला माजुरडी म्हणणार नाही. माझ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेल्या प्रत्येकाला मी वेळच्या वेळी मानधन दिलं आहे”. 

तेजस्विनी म्हणाली,”एक अभिनेत्री असल्यामुळे कलाकारांच्या बेसिक मागण्या मला माहित आहेत. त्यांना चांगलं जेवण, राहण्याची उत्तम सोय, सेटवर चांगले वॉशरुम, पाण्याच्या स्वच्छ बॉटल्स आणि अर्थात चांगलं वातावरण ठेवण्याचा मी प्रयत्न करते. मनोरंजनसृष्टीत मानधनावरुन प्रचंड रडारड होते. पण मी त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करते”. 

तेजस्विनी पंडितचा मोठा गौप्यस्फोट

तेजस्विनीला तिचं लग्न प्रचंड महागात पडलं आहे. लग्नाचं कारण देत दोन सिनेमांमधून तिला रिजेक्ट करण्यात आलं आहे. ‘दुनियादारी’ सिनेमातील सईने साकारलेली शिरीन तेजस्विनी साकारणार होती. तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या सिनेमात ती नाना पाटेकरांसोबत झळकणार होती. 

News Reels

तेजस्विनी पंडित म्हणाली,”बिल गेट्स सारखा पैसा हवा, फरहान अख्तरसारखा आवाज पाहिजे, रणदीप हुड्डाचं कौशल्य आवडत असल्याने मला तो खूप आवडतो. ही मंडळी समोर आली की माझी नजर हटत नाही”. 

भूमिका ब्रेक करण्यासाठी लागला ब्रेक

‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमाच्या माध्यमातून तेजस्विनीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं. तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधुताईंची भूमिका केल्यानंतर मला तशापद्धतीच्या भूमिकेसाठीच विचारणा होत राहिली. पण मला पुन्हा त्या भूमिका करायच्या नव्हत्या. त्यामुळे मी त्या भूमिका नाकारल्या. 

संबंधित बातम्या

Tejaswini Pandit : पुण्यातील नगरसेवकानं माझ्याकडे केलेली घाणेरडी मागणी, मग मी…; तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here