Avatar The Way Of Water Box Office Collection Day 6 Wednesday Earnings In India

0
25


Avatar 2 Box Office Collection:  अवतार द वे ऑफ वॉटर  (Avatar The Way Of Water) म्हणजेच (Avatar 2)  हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले. चित्रपटातील  VFX आणि कथा यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने बुधवारी (21 डिसेंबर)  सहाव्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊया.

पहिल्या वीकेंडच्या तुलनेत वीक डेमध्ये चित्रपटाच्या कमाईतही घट झाली तरी ‘अवतार 2’चे कलेक्शन खूपच चांगले आहे.  पहिल्या दिवशी चित्रपटाने 40.3 कोटींची कमाई केली आहे. दुस-या दिवशी चित्रपटाने 42.5 कोटी कमावले तर तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 46 कोटींवर पोहोचला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 18.6 कोटींची कमाई केली आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने मंगळवारी 16.5 कोटींचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवसाचे कलेक्शन पाहूयात- 

रिपोर्टनुसार, ‘अवतार द वे ऑफ वाटर’  या चित्रपटानं बुधवारी 15.25 कोटींची कमाई केली. आता अवातरचे एकूण कलेक्शन 179 कोटी एवढे झाले आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ भारतात 3800 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं म्हटलं जात आहे. 

‘अवतार 2’ या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

News Reels

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमात प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सॅम वर्थिंग्टन  जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तसेच जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here