Paris Shooting: पॅरिस शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी आज अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या वक्तीला पॅरिस पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार घडलेल्या ठिकाणापासून नागरिकांनी दूर रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पॅरिस शहराच्या रु डी’एनघेईन (Rue d’Enghien) या मध्यभागी असलेल्या ठिकाणी हा गोळीबार घडला आहे. या गोळीबाराच्या मागचे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
मेट्रो स्टेशनपासून जवळ असलेल्या कुर्दिश सांस्कृतिक केंद्राजवळ ही गोळीबाराची घटना घडली. मेट्रो स्टेशन जवळील रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्स आणि दुकाने तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. त्यानंतर 69 वर्षाच्या संशयिताला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
एका दुकानदाराने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि त्यानंतर या परिसरात मोठा गोंधळ माजला. आम्ही सगळ्यांनी दरवाजे बंद केले.
News Reels
गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त केले अशी माहिती आहे.