Imran Khans Ex Wife Reham Khan Marries US-Based Pakistani Actor Mirza Bilal Know Details

  0
  23


  Imran Khan X-Wife Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी तिसरं लग्न केले आहे. सोशल मिडियावरुन त्यांनीच ही माहिती दिली आहे. रेहम खान यांचे तिसरे पती मिर्झा बिलाल बेग हे अमेरिकन मॉडेल आणि अभिनेता आहेत. विशेष म्हणते मिर्जा बिलाल बेग यांचाही हा तिसरा विवाह आहे. रेहम खान यांनी  लग्नानंतर मिर्जा बिलाल बेग यांच्यासोबत फोटो पोस्ट करत ‘जस्ट मॅरिड’ असं कॅप्शन लिहित आपल्या लग्नाची माहिती दिली आहे.  (Reham Khan Mirza Bilal Wedding)

  49 वर्षीय रेहम खान यांनी 36 वर्षीय मॉडल मिर्झा बिलाल बेग यांच्यासोबत अमेरिकामध्ये सिएटल येथे लग्न केलेय. रेहम खान यांनी आणखी एक ट्वीट केलेय. त्यामध्ये त्या म्हणतात की, अखेर मला असा जिवनसाथी मिळालाय, ज्यावर मी विश्वास ठेवू शकेन. 

  News Reels

  रेहम खान यांचं तिसरं लग्न – 
  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांचं आज तिसरं लग्न झालं.  यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान यांसोबत लग्न केले होते. पण वर्षभरानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.  1993 मध्ये  रेहम खानं यांचं पहिले लग्न एजाज रहमानसोबत झाले होते. 2005 मध्ये घटस्फोट झाला होता. आता त्यांनी तिसरं लग्न केलेय. रेहम खान यांनी बिलाल यांच्याशी लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.  सोशल मीडियावर त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 
   
  मिर्झा बिलाल बेग कोण आहे?
  मिर्झा बिलाल बेग हे पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आहेत. मॉडेलिंगशिवाय अॅक्टिंगमध्येही ते कार्यकरत आहेत. ते सध्या एका कॉर्पोरेट कंपनीचे मालक आहेत. 4 मॅन शो आणि दिल पे मत ले यार यासारखे टीव्ही शो केले आहेत.  बिलाल यांचे हे तिसरे लग्न आहे. आधीच्या दोन पत्नीपाशून त्यांना तीन मुलं आहेत.  

  ही बातमी वाचाच:

  Mumbai IIT: आयआयटीची पोरं हुशार! मुंबई आयआयटीत भरघोस पॅकेज; एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार, 25 विद्यार्थ्यांना एक कोटी…

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here