Shah Rukh Khan Deepika Padukone Jhoome Jo Pathaan Song KRK Comment

0
30


KRK On Jhoome Jo Pathaan Song: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाणमधील झूमे जो पठाण हे गाणं देखील रिलीज झाला. या गाण्यातील शाहरुखच्या फिटनेसनं आणि दीपिकाच्या ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यावर कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेनं प्रतिक्रिया दिली आहे. 

केआरकेनं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘मी झूमे जो पठाण हे गाणं पाहिलं.  या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणी वाचवू शकत नाही. शाहरुख भारतातील प्रेक्षकांसोबत पंगा घेत आहे. शाहरुख, हा भारत आहे, पाकिस्तान नाही. ‘

केआरकेला नेटकऱ्यानं केलं ट्रोल
एका नेटकऱ्यानं केआरकेच्या ट्वीटला रिप्लाय देऊन त्याला ट्रोल केलं आहे. ‘शाहरुख खाननं असं कधीच केलं नाही. असे दिसते की, तुम्ही तो विद्यार्थी आहात ज्याला अमेरिकेचा प्रश्न विचारला जातो आणि तो त्याचा संबंध आफ्रिकेशी जोडतो! तुम्हाला शुभेच्छा.”तुझ्या रिव्ह्यूचा आमच्यावर काही परिणाम होत नाही.’ अशी कमेंट एका युझरनं केली.

कोण आहे केआरके?
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि  भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kamaal Rashid Khan : ‘दहा दिवस फक्त पाणी प्यायलो, दहा किलो वजन झाले कमी’; केआरकेनं सांगितला कारागृहात असतानाचा अनुभव

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here