TV Stars Christmas Day 2022 : आज 25 डिसेंबर 2022 रोजी जगभरात नाताळचा (Christmas Day 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कोणी कुटुंबियांसोबत तर कोणी मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करत नाताळचा सण साजरा करत आहेत. कोरोनानंतर देशभरात नाताळचा उत्साह आहे. बॉलिवूड कलाकारदेखील नाताळचा सण वेगवेवगेळ्या पद्धतीने साजरा करत आहेत.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने कुटुंबियांसोबत नाताळचा सण साजरा केला आहे. सेलिब्रेशनचा एक व्हिडीओदेखील तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सासू आणि ननंदसोबत ती डान्स करताना दिसत आहे. तिने ख्रिसमस ट्री खूपच छान सजवलं आहे.
News Reels
छोट्या पडद्यावरील अभिनेता अर्जुन बिजलानीने घरीच नाताळचा सण साजरा केला आहे. अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओत तो मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत अर्जुनने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री सुरभी ज्योती नववर्षाच्या स्वागतासाठी न्यूयॉर्कला गेली आहे. तिथेच ती नाताळचा सण साजरा करत आहे. सोशल मीडियावर तिने न्यूयॉर्कमधील ख्रिसमस ट्री सोबतचा फोटो शेअर केला आहे. 2022/12/25/4fd822e8a3cab4696d53b7bd2beb91481671936775387254_original.PNG” width=”352″ height=”536″ />
स्टार कपल अली गोनी आणि जास्मिन भसीन सध्या गोव्यात आपल्या कुटुंबियांसोबत नाताळचा सण साजरा करत आहेत. अलीने सोशल मीडियावर कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या