Tunisha Sharma Funeral Of Actress Tunisha Sharma Today The Body Was Sent To JJ Hospital For Post Mortem

0
21


Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं असून तिच्या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची चौकशी करणार आहेत. तसेच मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) तिच्या मृतदेहावर आज (25 डिसेंबर) सकाळी शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात येणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?

‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत तुनिषा शर्मा मुख्य भूमिकेत होती. वसईतील भजनलाल स्टुडियोत या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शनिवारी दुपारी तुनिषाने मेकअप रुममध्ये गळफात घेत आयुष्य संपवलं. संध्याकाळी 5 वाजता ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर तिला वसईतीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 


तुनिषा अभिनेता मोहम्मद शिझानसोबत रिलेशनमध्ये होती. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. 

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death: ‘मेन्स डे’ला ज्याचं भरभरुन कौतुक केलं, तोच मृत्यूचं कारण बनला? तुनिषानं शिझानवर लिहिलेली खास पोस्ट व्हायरल 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here