Avatar 2 Box Office Collection Avatar 2 Will Soon Reach The 300 Crore Mark You Will Be Amazed To Hear The Revenue Figure

0
33


Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे. 

‘अवतार 2’ हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रिलीजच्या दहाव्या दिवसानंतरदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 

दुसऱ्या वीकेंडला ‘अवतार 2’चा धमाका

रिलीजच्या पहिल्या वीकेंडला ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने 120 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने 59.1 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने 12.85 कोटी, शनिवारी 21.25 कोटी आणि रविवारी 25 कोटींची कमाई केली आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने आतापर्यंत 252 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. तसेच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 

‘अवतार 2’ या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ची कमाल! रिलीजच्या आठव्या दिवशीच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here