Siddharth Jadhav Aapala Sidhu Superstar Ranveer Singh Praised Siddharth Jadhav Video Get Viral

0
18


Siddharth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘सर्कस’ (Circus) या सिनेमात झळकत आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले.  

रणवीर सिंह म्हणाला,”सिद्धू सोबतचा माझा हा दुसरा सिनेमा असून, त्याच्यासारखा टेलेंटेड कलाकार मी आयुष्यात यापूर्वी क्वचितच पाहिला असेल. असं म्हणतात की, कलाकाराचा चांगुलपणा हा पडद्यावर झळकतोच, सिद्धूने आजवर जे प्रेम मिळवलय, याचे कारण म्हणजे तो माणूसच तसा आहे”. 

रणवीर सिंह म्हणाला,”सिद्धू एक खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि प्रेमळ असा माणूस आहे. ज्याच्यासोबत काम करावसं वाटेल, सिद्धार्थ सुपरस्टार आहे.” या शब्दांत त्याने सिद्धार्थचे कौतुक केले. सिध्दार्थने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून रणवीरचे आभार मानले आहेत. 


रणवीरने याआधीदेखील सिध्दार्थच्या ‘बालभारती’ सिनेमादरम्यान त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या सिनेमात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. तर इतरही अनेक कलाकार आहेत. मात्र यात मराठी कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळते. त्यात आपला मराठमोळा सिद्धार्थ जाधव नेहमीप्रमाणे भाव खाऊन जाणार हे नक्की.

Baal Bhaarti Movie Review: भाषेची बंधनं ओलांडणारा सिनेमा, वाचा बाल भारती चित्रपटाचा रिव्ह्यू…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here