Man Sings Kesariya On Guitar For Cops At Marine Drive Mumbai Video Viral On Social Media

0
24


Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण हा मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 

शिव नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘मरिन ड्राइव्ह, मुंबई’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण हा गिटार वाजवत ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणं गात आहे आणि त्याच्या समोर दोन पोलीस अधिकारी उभे आहेत. त्या तरुणाचं गाणं ऐकून ते पोलीस अधिकारी स्माईल देखील करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘मुंबईकर आणि मुंबई पोलीस, ग्रेट लव्ह स्टोरिया…’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं.

पाहा व्हिडीओ: 

News Reels


नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

एका नेटकऱ्यानं या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, ‘तरी देखील तुला दंड भरावा लागेल.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘या मुलाचा आवाज खूप छान आहे.’

आलिया भट्ट आणि रणवीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं गायलं आहे. केसरिया या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here