ICC Womens T20 World Cup 2023 Tri Series Team India Squad Announced Harmanpreet Kaur Captain Check Full Squad Players List

  0
  33


  Women’s T20 World Cup: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 साठी (Women’s T20 World Cup 2023) बीसीसीआय (BCCI) नं आज महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. विश्वचषकासोबतच ट्राय सिरजसाठीही संघाची निवड करण्यात आली आहे. भारत, वेस्ट विंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्राय सिरिज होणार आहे. 10 फेब्रुवारी 2023 पासून महिला टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात मैदानात उतरणार आहे. तर ट्राय सिरिज 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे.  

  विश्वचषकात ग्रुप 2 मध्ये भारतीय संघ

  टीम इंडिया वर्ल्डमध्ये ग्रुप-2 मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतीय संघासोबत इंग्लंड, वेस्ट विंडिज, पाकिस्तान आणि आयरलँड या संघाचा सामना आहे. दोन्ही ग्रुपमधील आघाडीच्या दोन संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर 26 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना होणार आहे. 

  वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ –
  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

  News Reels

  राखीव खेळाडू – सब्भीनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह.

  वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक –
  पहिला सामना पाकिस्तान विरोधात- 12 फेब्रुवारी : केप टाऊन.
  दुसरा सामना वेस्ट विंडिज विरोधात- 15 फेब्रुवारी, केप टाऊन.
  तिसरा सामना इंग्लंड विरोधात- 18 फेब्रुवारी: पोर्ट एलिजाबेथ.
  चौथा सामना आयरलँड  विरोधा- 20 फेब्रुवारी: पोर्ट एलिजाबेथ.

  ट्राय सिरिजसाठी भारतीय संघ –  
  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकुर, मेघना सिंह, अंजली सरवानी, शुष्मा वर्मा (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, सबभिनेनी मेघना, स्नेह राणा, शिखा पांडे. 

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here