Jaggu Ani Juliet Amey Wagh Marathi Movie Jaggu Ani Juliet Will Soon Hit The Screens.

0
19


Jaggu Ani Juliet : अभिनेता अमेय वाघचा (Amey Wagh) ‘जग्गू आणि जुलिएट’ (Jaggu Ani Juliet) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेयने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाची घोषणा केली आहे. 

‘जग्गू आणि जुलिएट’ हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी ही भन्नाट जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

अमेय वाघने या सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसलेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे ज्यावर ‘Rich’ असं लिहिलंय. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे”.


व्हिडीओ शेअर करत अमेयने लिहिलं आहे,”फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट, जग्गू आणि जुलिएट. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी”. आता या सिनेमात अमेय नक्की काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अमेय वाघचा नेहमीपेक्षा वेगळा असा अतरंगी लूक बघून सिनेमात आणखी कोणकोणते कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

महेश लिमये ‘जग्गू आणि जुलिएट’ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ 10 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Amey Wagh : महाराष्ट्राचा लाडका ‘फास्टर फेणे’ अमेय वाघचा वाढदिवस; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here