Leena Nagwanshi Death 22 Year Old Social Media Influencer Leena Nagwanshi From Chhattisgarh Ends Her Life After Tunisha Cause Of Death Still Unclear

0
28


Leena Nagwanshi Death : सेलिब्रिटींच्या आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. अशातच आता छत्तीसगडमधील सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर (Social Media Influencer) लीना नागवंशीने (Leena Nagwanshi) आत्महत्या केली आहे. 

लीना नागवंशीचा मृतदेह तिच्याच घराच्या टेरेसवर सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. छत्तीसगड येथील रायगडच्या केलो बिहार कॉलनीत ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लीना नागवंशीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

News Reels

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लीनाच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह टेरेसवरुन घरी आणला होता. सध्या या प्रकरणी चक्रधर नगरचे पोलीस तपास करत आहेत. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. 

लीना नागवंशी छत्तीसगडमधील एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टार होती. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह होती. तिचे इंस्टाग्रामवर 10,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स होते. तिचा चाहतावर्ग मोठा असून तिची प्रत्येक स्टाइल त्यांच्या पसंतीस उतरत होती. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलदेखील होते. 

वयाच्या 22 व्या वर्षी लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांआधीच लीनाने नाताळवर आधारित एक रील इंस्टावर शेअर केली होती. यात व्हिडीओमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे. तिने सुसाइड नोट लिहिलेली नसल्याने अद्याप तिच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. 


संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death : तुनिषा शर्माच्या आयुष्यातला शेवटचा क्षण समोर; रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here