Salman Khan Birthday Mumbai Police Lathi Charge At Fans Outside Salman Khan Galaxy Apartment Watch Video

0
24


Salman Khan Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salamn Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर खूप गर्दी केली होती. काही वेळातच ही गर्दी इतकी वाढली की ती गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

भाईजानच्या चाहत्यांना पोलिसांकडून लाठी चार्ज 

सलमानची एक झलक पाहण्यासाठी, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दबंग स्टारचा चाहतावर्ग मोठा असल्याने ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. सलमान खान दरवर्षी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत येत चाहत्यांना भेटत असतो. त्यामुळे त्याची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या लाठी चार्जनंतर चाहते इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. 

News Reels

सलमानने मानले चाहत्यांचे आभार!

सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत तो पाठमोरा उभा असून समोर चाहत्यांची प्रचंड गर्दी दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”सर्वांचे आभार”. या फोटोत सलमानने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे. 


सलमानला भेटण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण यावर्षी सुरक्षेच्या कारणाने मुंबई पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गर्दी करू नका असं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्याच्या घराबाहेर खास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीदेखील चाहते सलमानची एक झलक पाहण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. 

सलमान खानचे आगामी सिनेमे

गेली तीन दशके आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या सलमान खानची क्रेझ आजही कायम आहे. सलमानचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. यात ‘टायगर 3’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘किक 2’, ‘नो एन्ट्री सीक्वेल’ अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ सिनेमातदेखील भाईजानची एक झलक पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan Birthday : दबंग भाईजानचा बर्थडे; मात्र शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर एकही फॅन नाही, कारण…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here