Tunisha Sharma Death Case Vasai Court Sends Accused Sheezan Khan To 2 Day Police Custody

0
28


Sheezan Khan: अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) हा पोलीस कोठडीत आहे. आरोपी शिजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

25 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता  शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तुनिषा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवण्यात आला. शिझानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तुनिषाची आत्महत्या नक्की कशामुळे झाली हे अद्याप समोर आलेले नाही. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलीस शिझान खानची सतत चौकशी करत आहेत. शिझान एकाचवेळी अनेक मुलां डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.

कोण आहे शिझान खान? 

शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. ‘जोधा अकबर’ (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tunisha Sharma Death Update : शिझान खान आज न्यायालयात हजर होणार; जबाबात म्हणाला;”… म्हणून केला तुनिषासोबत ब्रेकअप”

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here